Share

मोदींना बदनाम करण्यासाठी काँग्रेस टूलकिट वापरत असल्याचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. देशावरील कोरोना संकट गडद झाले असून कोरोनाशी लढा तीव्र झाला आहे देशात करोनाचं इतकं मोठं संकट असताना दुसऱ्या बाजूला राजकारण देखील जोरात सुरूच आहे. आज भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कोरोनावरून सुरु असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर एका टूलकिचा हवाला देत जोरदार हल्लाबोल केला.

काँग्रेसनं करोना संकट काळात अफवा आणि संभ्रम पसरवल्याचा आरोप भाजपानं केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमा खराब करण्यासाठी काँग्रेस टूलकिटचा वापर करत असल्याचा आरोप संबित पात्रा यांनी केला आहे.

पात्रा म्हणाले, ‘या टूलकिटमध्ये असे म्हटले आहे की, काही प्रकाशनांमध्ये मिसिंग मॅनेजमेंट आणि मिसिंग गव्हर्नमेंट छापा. टूलकिटमध्ये असेही म्हटले आहे की, वारंवार पत्र लिहायला लावा. याअंतर्गत कधी सोनिया गांधी, कधी राहुल गांधी तर कधी तथाकथित व्यक्तींकडून पत्र लिहून घ्या. या टूलकिटमध्ये असेही म्हटले आहे की, पत्र मधूनमधून लिहित राहायचे आहे आणि असेही सांगण्यात आले आहे की, कशा प्रकारे हे पत्र लिहिले जावे.

टूलकिटमध्ये सांगण्यात आले आहे की, पीएम केअर्स फंडवरूनही विविध प्रश्न विचारायचे आहेत, आणि काँग्रेस तेच सर्व करत आहे. या टूलकिटच्या हिशेबाने मोदी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अयोग्य शब्दांचा वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. इंडियन स्ट्रेनला मोदी स्ट्रेन म्हणायचं आहे. कुंभला सुपर स्प्रेडरप्रमाणे सांगायचं आहे. परंतु ईदला काहीच म्हणायचं नाही,असं पात्रा यांनी कथित टूलकिट दाखवताना म्हटलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!