Share

पोलिसांची पुन्हा आरोग्य सहायकास मारहाण!

Published On: 

🕒 1 min read

बीड: कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावर कठोर कारवाई देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मात्र ही कारवाई कोणावर करायची याची समज पोलिसांना आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी व आरोग्य अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली होती. असाच प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. केज तालुक्यातील चिंचोली येथील एका आरोग्य सहायकास मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ड्यूटी करण्यासाठी येत असलेल्या आरोग्य सहायकास बोरगाव चेक पोस्टवर पोलिस कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजता घडली. संबधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी केली आहे. आरोग्य सहायक चंद्रसेन खाडे हे सोमवारी सकाळी नऊ वाजता ड्यूटीवर येत होते. तालुक्यातील बोरगाव येथील चेक पोस्टवर पोलिसांनी चंद्रसेन खाडे यांना अडवून शिवीगाळ करत मारहाण केली आहे.

कोरोना सारख्या संकट काळात आरोग्य कर्मचारी अहोरात्र काम करत असून रुग्णांची सेवा करत आहेत. तसेच संचारबंदीत विनाकारण बाहेर निघून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा सूचना आहेत. मात्र पोलीस विचारपूस न करता थेट शिवीगाळ करत मारहाण करत आहेत, याचा तीव्र निषेध आरोग्य कर्मचारी व्यक्त करत आहेत. संबधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!