🕒 1 min read
मुंबई : कोरोनामुळे राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने २७ जूनला होणारी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा स्थगित केली आहे. गुरुवारी याबाबत परिपत्रक काढण्यात आलं. आता ही परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे. यावरुन काँग्रेस नेते भाई जगताप यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केलंय.
गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा रद्द केल्यानंतर पुण्यातील रस्त्यावर झोपून आंदोलन केले होते. त्यामुळे, विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात मोठा सहभाग घेतला. त्यानंतर, एमपीएससीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता, युपीएससीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
एमपीएससी परीक्षा स्थगित केल्यानंतर गोंधळ घालणारे आता कुठे गेले? असा थेट सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे. यावर त्यांनी एक ट्वीट करत ही टीका केली आहे. खरंतर, एमपीएसी परीक्षा रद्द केल्यानंतर राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली आहे. त्यावर भाई जगताप यांनी भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे…
केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत??
आता दातखिळी बसली आहे का??#महाराष्ट्रद्रोही
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) May 17, 2021
भाई जगताप यांनी ट्वीटमध्ये लिहलं आहे की, ‘राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे, केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत? आता दातखिळी बसली आहे का??’ अशा शब्दात जगताप यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.
दरम्यान, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने राज्य सेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली. अवघ्या दोन दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये मोठी नाराजी आहे. पुणे येथे उमेदवार रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. परीक्षा स्थगित करू नये अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेना आ. प्रताप सरनाईक बेपत्ता? ईडी, सीबीआयची लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाड
- काँग्रेस आ.प्रणिती शिदेंच्या बैठकीला प्रचंड गर्दी, आमदारासह माजी खासदारांवर गुन्हा
- पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त पोस्टरप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
- ‘खतांच्या किमती कमी न झाल्यास राज्य सरकार सबसिडी देणार’, मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
- मोदी राजा नाही, टीका करणे हा लोकशाहीचा अधिकार-प्रकाश आंबेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
