🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. या सामन्यात भारत आणि न्युझीलंड हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे आहेत. इंग्लंडमधील साउथहॅम्पटन येथे १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना होणार आहे.
या सामन्यात खेळायला उतरताच भारतीय क्रिकेट संघ ८९ वर्षे जुना एक इतिहास बदलणार आहे. भारतीय संघ ८९ वर्षाच्या इतिहासात प्रथमच तटस्थ ठिकाणी सामना खेळेल. आयसीसीच्या कसोटी संघाचा दर्जा प्राप्त झालेल्या १२ देशापैकी केवळ दोन संघानी तटस्थ ठिकाणी सामने खेळलेले नाही. भारताव्यतीरिक्त बांग्लादेश हा दुसरा संघ आहे. मात्र डब्लुटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर बांग्लादेश हा एकमेव संघ उरेल जो तटस्थ ठिकाणी सामना खेळलेला नाही.
तटस्थ ठिकाणी सर्वात जास्त सामने खेळण्याचा विक्रम हा पाकिस्तानच्या नावे आहे. पाकिस्तानने आतापर्यंत ३९ वेळेस तटस्थ ठिकाणी सामने खेळलेले आहे. पाकनंतर या यादीत ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. ऑस्ट्रेलियाने १२ वेळेस तटस्थ ठिकाणी सामने खेळले आहे. यानंतर श्रीलंका (९), दक्षिण अफ्रिका(७) तर न्युझीलंड(६), वेस्ट इंडिज(६), इंग्लंड(६) यांचा नंबर लागतो. तर या यादीत पुढे अफगाणिस्तान (४), झिम्बाब्वे(२) आणि आयर्लंड(१) या संघानी तटस्थ ठिकाणी सामने खेळलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आर अश्विनकडून नकळत झाली मोठी चूक ; सोशल मीडियावर मागितली सर्वांची माफी
- होय…! महाराष्ट्र जिंकणार, कोरोना हरणार ; आज रुग्ण्संखेत मोठी घट
- ‘फडणवीसांनी इतरांना पत्र लिहिण्यापेक्षा, वणवण फिरण्यापेक्षा नागपुरातच बसावं’
- परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांवर आता CID करणार चौकशी ; अडचणी वाढणार?
- ‘निसर्ग वादळाची मदत मिळालीच नाही, आता तौक्ते वादळानंतर तरी जनतेच्या पाठीशी उभे रहा’

