Share

परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांवर आता CID करणार चौकशी ; अडचणी वाढणार?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते. अंबानी स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी सचिन वाझे याचे नाव आल्यानंतर परमबीर सिंह यांची बदली करण्यात अली होती. यानंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून हे गंभीर आरोप केले होते.

दरम्यान, या सर्व प्रकरणाची सध्या सीबीआय चौकशी सुरु असून अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु हे प्रकरण घडताच परमबीर सिंग यांच्यावर एकापाठोपाठ एक अनेक ताकारी विविध ठिकणी नोंदवण्यात आल्या होत्या .ठाणे शहर पोलीस आयुक्तपदावर असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. या तक्रारीत भिमराज घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्यासोबतच 27 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

परमबीर सिंग यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी दाखल केलेल्या प्रकरणाची चौकशी सीआयडी पथकाने सुरू केली आहे. या प्रकरणात सीआयडीच्या टीमने तक्रारदार असलेले पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

परमबीर सिंग यांच्यासह इतर 27 पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच विरारचे व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर आरोप केला आहे. २०१७ मध्ये पोलिसांनी घरावर दरोडा टाकून दोन गाड्या चोरी केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. यामुळे आता परमबीर सिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!