Share

होय…! महाराष्ट्र जिंकणार, कोरोना हरणार ; आज रुग्ण्संखेत मोठी घट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कोरोना रुग्ण घटण्याच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. राज्यात आज दिवसभरात नव्याने २६,६१६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आनंदाची बाब म्हणजे राज्यात आज तब्बल ४८,२११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तांचा आकडा हा गेले काही दिवस जास्त असल्याने रिकव्हरी रेटमध्ये चांगली वाढ झाली आहे. तर दुर्दैवाने आज राज्यामध्ये ५१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद महाराष्ट्रात करण्यात येत होती. दरम्यान, राज्यातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम सध्या दिसून येत आहे. परंतु राज्यावरील कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!