Share

‘फडणवीसांनी इतरांना पत्र लिहिण्यापेक्षा, वणवण फिरण्यापेक्षा नागपुरातच बसावं’

Published On: 

🕒 1 min read

अकोला : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाची स्थिती गंभीर असून केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका मोदी सरकावर ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियातूनही मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारवर टीका होत आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेली पत्रं आणि विविध काँग्रेस नेत्यांची वक्तव्य डोळ्यापुढे ठेवत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठविले असून, त्यांना महाराष्ट्रातील स्थितीची आणि त्याचा संपूर्ण देशातील कोरोना लढ्यावर होणारा परिणाम याची जाणीव करून दिली आहे. यासोबतच, यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का? असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर तोफ डागली आहे.

आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. ‘देवेंद्र फडणवीसांनी इतरांना पत्र लिहिण्यापेक्षा, वणवण फिरण्यापेक्षा नागपुरातच बसावं. त्यांनी नागपुरात चार-पाच कोविड सेंटर उभारावेत,’ असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ते अकोला येथील सर्किट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे त्यांनी, ‘दुसऱ्या लाटेचं अपयश हे फक्त मोदींचा ममतांना पराभूत करण्याच्या अट्टहासामुळे,’ असल्याची टीका देखील केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!