🕒 1 min read
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
अशा सर्व भीषण परिस्थितीमध्ये सर्वांना आता एक दिलासा मिळणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 2-डीजी या औषधाचं लोकार्पण करण्यात आलं. 2-डीजी हे भारतातील कोव्हिड-19 रुग्णांसाठीचं पहिलं औषध असल्याचा दावा केला जात आहे. हे औषध भारताच्या कोव्हिडविरोधी लढ्याला बळकटी देईल असं लोकार्पण सोहळ्यावेळी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. हे औषध भारताच्या संरक्षण आणि विकास प्राधिकरणानं (डीआरडीओ) बनवलं आहे. काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने 2-डीजीच्या वापराला मान्यता दिली आहे.
Handed over the first batch of 2-DG anti Covid drug to the Union Health Minister @drharshvardhan after it was released today.
This 2-DG drug developed by @DRDO_India & DRL is a perfect example of India’s scientific prowess and a milestone in the efforts towards self-reliance. pic.twitter.com/oiuR2VVr2I
— Rajnath Singh (@rajnathsingh) May 17, 2021
डीआरडीओनं जारी केलेल्या माहितीनुसार 2 डेक्सोय डी ग्लुकोजच्या रुग्णांना दिलं गेलं ते रुग्ण वेगानं रिकव्हर होतात. त्याचा बरा होण्याचा वेग नियमितपणे केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीपेक्षा चांगला असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. नियमित उपचार पद्धतीनं रुग्ण बरा होण्यासाठी लागणारा वेळ आणि 2 डेक्सोय डी ग्लुकोज दिलेले रुग्ण बरे होण्याचा वेळ यांच्यामध्ये जवळपास 2.5 दिवसांचा फरक आढळून आल्याचं डीआरडीओकडून सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘म्युकरमायकोसिस’च्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध – अजित पवार
- ‘एकाचे लक्ष मुंबईवर तर दुसऱ्याचे बारामतीवर, उर्वरित राज्य वाऱ्यावर’
- मुंबई सावरतेय : नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट !
- अबकी बार, महंगाई की मार ! घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांच्या पार
- मोदी साहेब, बळीराजाने पेरायचे काय आणि खायचे काय? राष्ट्रवादीच्या चव्हाणांचा मोदींना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
