🕒 1 min read
मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. काल गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकण, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी तौक्ते वादळालाही राजकीय रंग देण्याच्या प्रयत्नात अजब विधान केलं आहे. केंद्र सरकारसह भाजपच्या नेत्यांवर टीका करण्याच्या प्रयत्नात त्यांनी तौक्ते वादळालाच आव्हान दिलं आहे. ‘तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे. त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये. राष्ट्रीय स्तरावरील वादळ असल्यामुळे याची चिंता दिल्लीश्वरांनी करावी. छ. शिवरायांचे राज्य असे अनेक वादळ परतून लावतो. ती हिम्मत दिल्लीश्वर व इथल्या १०६ शिपायांमध्ये नाही,’ अशी टिप्पणी अमोल मिटकरी यांनी ट्विटद्वारे केली आहे.
याला काय म्हणणार??? या माणसाचा कचरा करायला शब्दच नाहीत. हवामान खात्यातील कर्मचारी हे वाचून ढसाढसा रडून मरतील. ते म्हणतील उगाच खर्च करून अभ्यास केला, डिग्री मिळवली… आकाशाला खुन्नस देत मिटकरी उभा आहे ना थर्माकोलची तलवार घेऊन. https://t.co/7tJ101zdgk
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 17, 2021
आता भाजप नेते निलेश राणे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ ला प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘याला काय म्हणणार??? या माणसाचा कचरा करायला शब्दच नाहीत. हवामान खात्यातील कर्मचारी हे वाचून ढसाढसा रडून मरतील. ते म्हणतील उगाच खर्च करून अभ्यास केला, डिग्री मिळवली… आकाशाला खुन्नस देत मिटकरी उभा आहे ना थर्माकोलची तलवार घेऊन,’ अशी खिल्लीच निलेश राणे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘एकाचे लक्ष मुंबईवर तर दुसऱ्याचे बारामतीवर, उर्वरित राज्य वाऱ्यावर’
- औरंगाबादेत कोरोना रुग्णांसाठी गॅस दाहिनीचे काम वेगात!
- मुंबई सावरतेय : नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट !
- ‘म्युकरमायकोसिस’च्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध – अजित पवार
- अबकी बार, महंगाई की मार ! घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांच्या पार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
