🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना संकट काळात आधीच शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळत नसल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. त्यात खतांच्या किमतीत ५०० ते ७०० रुपयांनी वाढ करून केंद्र सरकारने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मोदी साहेब, खतांच्या किमती वाढल्यामुळे बळीराजाने पेरायचे काय आणि खायचे काय? याचा आता तुम्हीच विचार करा. असा सवाल औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आ. सतिश चव्हाण यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला आहे.
पावसाळा तोंडावर आला आहे. शेतकरी वर्ग मशागतीच्या कामाला लागला आहे. पण केंद्र सरकारने खतांच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. एकीकडे शेतमालाच्या किंमती घसरल्या असतांना खतांच्या किमती वाढल्याने शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. खतांच्या किमतीत ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. असे असतांना देशातील शेतकरी संघटना मात्र मूग गिळून गप्प का? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाच्या संकट काळात आधीच शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळत नसल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. त्यात खतांच्या किमतीत 500 ते 700 रुपयांनी वाढ करून केंद्र सरकारने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते.
— Satish Chavan (@satishchavan55) May 17, 2021
यावेळी ते म्हणाले, केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते. इथे तर त्यांनी खतांचेच दर दुप्पट केलेत. मोठा गाजावाजा करून ‘पीएम किसान’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार जमा करायचे अन खतांचे दर वाढवून ते परत काढून घ्यायचे. ही कसली ‘पीएम किसान योजना’? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मोदी साहेब, खतांच्या किमती वाढल्यामुळे बळीराजाने पेरायचे काय आणि खायचे काय? याचा आता तुम्हीच विचार करा. म्हणत केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तौक्ते वादळ हे राष्ट्रीय वादळ, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये : अमोल मिटकरी
- औरंगाबादेत कोरोना रुग्णांसाठी गॅस दाहिनीचे काम वेगात!
- हुश्श… ! कोरोनाची दुसरी लाट लवकरच संपणार…
- असे चक्रीवादळ मुंबई पहिल्यांदाच अनुभवतीये ; आदित्य ठाकरेंनी घेतला कंट्रोल रुममधून आढावा
- पिंपरी-चिंचवडमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला; वायसीएममध्ये १२ रुग्णांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
