🕒 1 min read
नवी दिल्ली : नेहमीच आपल्या विधानांवरून वादात सापडणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या पुन्हा एकदा नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. कोरोनामुळे होणारा फुफ्फुसातील संसर्ग गोमूत्र प्यायल्याने बरा होऊ शकतो, असे त्या म्हणाल्यात. गोमूत्र प्यायल्याने करोनासुद्धा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी स्वतःचे उदाहरण देत आपण रोज गोमूत्र पीत असल्याने कोरोना झाला नसल्याचा दावा त्यांनी केला.
रविवारी भोपाळच्या संत नगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोमूत्र हे आपल्यासाठी जीवनदायी असल्याने प्रज्ञा ठाकूर यांनी सांगितले.
"गौ मूत्र लेने से फेफड़ों का इंफेक्शन दूर होता है, मैं लेती हूं इसलिए मुझे कोरोना नहीं हुआ" :
– BJP सांसद प्रज्ञा@drharshvardhan – Sir, is it true? pic.twitter.com/jLdyR2PBSs
— Srinivas BV (@srinivasiyc) May 17, 2021
‘गोमूत्र पिण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु, ते थेट पिता येत नाही. त्यावर गाळणप्रक्रिया गरजेचं आहे. गोमूत्र १६ वेळा गाळून घ्यायला हवा, असा सल्ला द्यायलाही साध्वी प्रज्ञा सिंह विसरल्या नाहीत. कोरोनासारख्या संकटसमयी खासदार साध्वी गायब झाल्याच्या टीकेलाही त्यांनी प्रत्यूत्तर दिलंय. काही जण मी गायब झाल्याची चर्चा करत आहेत. सोबतच माझ्यावर काही बक्षीसही घोषित करत आहेत. हे लोक असंवैधानिक गुन्हे करत आहेत. त्यांना क्षमा केली जाऊ शकत नाहीत’, अशी आगपाखडही आपल्या विरोधकांवर साध्वींनी केलीय.
दोन वर्षांपूर्वी गोमूत्रामुळे आपला कर्करोग बरा झाला असा दावा प्रज्ञा ठाकूर यांनी केला होता. प्रज्ञा ठाकूर यांनी डिसेंबर २०२० मध्ये करोनाची लक्षणे जाणवल्याने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
- बंगाल में बवाल! ममता समर्थकांची सीबीआय कार्यालयावर दगडफेक
- ‘एवढा मोठा धिप्पाड गडी कोरोनाशी झुंज देताना हरला..’, कार्यकर्त्याच्या आठवणीत राजू शेट्टी भावूक
- ‘पनवतीयों का बाप है ये बॉस’, नितेश राणेंचे मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान
- दिलासा! आ.श्वेता महालेंनी सुरू केले आधार कोविड सेंटर
- तौत्के चक्रीवादळ; कामगार महिलेचा व्हिडिओ ‘तुफान’ व्हायरल, आनंद महिंद्रांनीही शेअर करत मनपाला दिला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
