Share

#तोक्ते चक्रीवादळाचा कोल्हापूरलाही फटका; घरांसह शाळांचे छत उडाले, लाखोंच नुकसान

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. हे चक्रीवादळ आज महाराष्ट्राच्या किनारपट्टीभागातून पुढे जात आहे.

यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गासह पश्चिम महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. कोल्हापुरात अनेक तालुक्यांमध्ये मुसलदार पाऊस सुरु असून आज दिवसभरात अनेक ठिकाणी वाहने, घरे, शाळा, शासकीय कार्यालयं यांवर झाडे पडण्यासह छत उडून गेल्याने लाखोंचं नुकसान झालं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आजरा, चंदगड, हातकणंगले, भुदरगड, करवीर, शाहूवाडी या तालुक्यांमध्ये घरांची, शाळांची पडझड होऊन वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

कोल्हापूर शहरात देखील विद्युतवाहिनी तारांवर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांचे घर्षण झाल्याने स्फोट होऊ लाईट जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत असल्याने या वादळाचा परिणाम आणखी एक दिवस राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!