मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे.
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यादरम्यान अनेक कोरोनाचे नवे स्ट्रेन आढळताना दिसत असून अजूनच चिंता वाढत आहे. पण कोव्हॅक्सिन लस कोरोना व्हायरसच्या सर्व नव्या स्ट्रेन असरदार असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. कोरोनाच्या सर्व स्ट्रेनवर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस परिणामकारक आहे. भारत आणि UK मध्ये आढलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही कोव्हॅक्सीन प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेककडून करण्यात आलाय.
प्रामुख्याने B.1.617 आणि B.1.1.7 कोरोना व्हेरिएन्ट्स हे भारत आणि UK मध्ये आढळले आहेत. कोरोनाच्या या व्हेरिएन्ट्सवरही कोव्हॅक्सीन प्रभावी असल्याचं भारत बायोटेकने रविवारी म्हटलंय. कोव्हॅक्सीनचा वापर B.1.1.7 (UK मध्ये आढळलेला स्ट्रेन) आणि व्हॅक्सीन स्ट्रेन (D614G) च्या न्यूट्रिलायझेशनध्ये काही बदल दिसून आला नसल्याचं भारत बायोटेकने म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ५३ लाख ७८ हजार ४५२ कोरोनाबाधितांपैकी ४८ लाख २६ हजार ३७१ जण बरे झाले. यामुळे राज्याचा कोरोना रुग्ण बर होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट ८९.७४ टक्के झाला. कोरोनामुळे राज्यात ८१ हजार ४८६ मृत्यू झाले. तसेच कोरोना झालेल्यांपैकी २ हजार ४८६ जणांचा इतर काराणांमुळे मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. यामुळे राज्याचा कोरोना मृत्यू दर १.५२ टक्के झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दिलासादायक : तब्बल ५९ हजार रुग्ण कोरोनामुक्त तर रुग्णसंख्येतही मोठी घट
- लग्नाच्या दिवशीच वधूची प्रियकरासोबत गळफास घेत आत्महत्या!
- कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी कधी लसीकरण करून घ्यावे ? घ्या जाणून !
- रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीची दुसरी खेप हैदराबादमध्ये दाखल
- ‘महाराष्ट्राची प्रगती पचत नाही म्हणूनच फडणवीस असे उद्योग करतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

