Share

‘…तरीही मराठी कलाकारांच्या योगदानाबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. याची खबरदारी म्हणून काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले तर काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले. अशा परिस्थितीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी गरजू व्यक्तिना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. सोनू सूद, अजय देवगण, सलमान खान, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक कलाकार आपापल्यापरीने मदत कार्य करत आहेत.

तर दुसरीकडे मराठी कलाकारसुद्धा कोरोना काळात मदत करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. पण तरीही मराठी कलाकारांच्या योगदानाबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो यावरच मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपले मत व्यक्त केले आहे. प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने याविषयी आपले मन मोकळे पणाने भाष्य केले आहे.

काही मराठी कलाकार दिवस रात्र कोरोना काळात सेवा करतायेत. कुणी कोविड टेस्टिंग लॅब उपलब्ध करुन दिली आहे. कुणी रक्तदान करत आहे, कुणी जेवणाची सोय करत आहे. कोरोना काळात सोशल मीडियावर करोनाशी संबधित आलेली प्रत्येक माहिती पोस्ट करत आहेत. कुणाला बेड हवाय तर कुणाला ऑक्सिजन.

https://www.instagram.com/p/COzVTC_FP3c/?utm_source=ig_web_copy_link

कुठे काय उपलब्ध आहे याची आमच्याकडे आलेली माहिती आम्ही चाहत्यांसोबत शेअर करत आहोत. जेणेकरून आमच्या एखाद्या पोस्टमुळे गरजूंना मदत होईल. मी स्वतः सोशल मीडियाचा वापर हा करोनाशी संबंधित पोस्टसाठी करत आहे. फक्त इतकंच की आम्ही केलेल्या मदतीचा कुठेही गाजावाजा करत नाहीत. मात्र तरीही यावर प्रश्न उपस्थतीत केले जातात या गोष्टीचे वाईट वाटते असे मत यावेळी सिद्धार्थने केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!