Share

कसोटी क्रिकेटच्या न खेळण्याच्या वृत्ताचे भुवनेश्वर कुमारने केले खंडण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघात अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला स्थान न मिळाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. याबद्दल विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत होत्या. यादरम्यान भुवनेश्वर स्वत: कसोटी क्रिकेट खेळण्यास उत्सुक नाही असे वृत्त समोर आले. मात्र ही केवळ अफवा असल्याचे भुवीने ट्विट करुन स्पष्ट केले.

शुक्रवारी १५ मे रोजी अनेक ठिकाणी भुवनेश्वर स्वत: कसोटी क्रिकेट खेळण्यास उत्सुक नसल्याच्या बातम्या झळकल्या. यामुळेच त्याला इंग्लंड दौऱ्यातील कसोटी संघात स्थान मिळाले नाही असा कयास लावला जात होता. मात्र सांयकाळी भुवीने एक ट्विट करुन या सर्व केवळ अफवा असल्याचे सांगितले. या ट्विटमध्ये भुवी म्हणतो,’मी कसोटी क्रिकेट खेळु इच्छीत नाही अशा बातम्या सगळीकडे दिसत आहे. या पार्श्वभूमिवर मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. मी नेहमी क्रिकेटच्या तिनही प्रकारात खेळण्यासाठी स्वत:ला तयार केले आहे. आणि मी हे नेहमीच करत राहणार.’ असे लिहत तो क्रिकेटच्या तिनही प्रकारासाठी उपलब्ध असल्याची ग्वाही दिली.

तसेच या ट्विटमध्ये पुढे त्याने एक सल्ला देत म्हणाला की, कृपया कोणत्याही ‘सुत्रांच्या’ आधारे काहीही तर्क वितर्क लावुन लिहू नका. २०१८ साली दक्षिण अफ्रिकेविरुद्ध आखेरचा कसोटी सामना खेळल्यानंतर दुखापतीमुळे भुवनेश्वर कसोटी संघातुन बाहेर झाला. मात्र यादरम्यान इतर खेळाडूंनी संघात जागा पटकावत त्यांची जागा पक्की केली आहे. त्यामुळे त्याला संधी मिळण्यास अडचण होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!