पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद पुणे शहरात करण्यात येत होती. दरम्यान, शहरातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम दिसून आला होता. एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सहा हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत होती. आज पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा २ हजारांच्या आत आला आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शहरात नव्याने १ हजार ८३६ कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, कोरोनामुक्तांचा आकडा आजही नव्या बाधितांपेक्षा अधिक आहे. यामुळे महापौर मोहोळ यांनी ‘ट्रेंड कायम’ असं देखील नमूद केलं आहे. आज ३ हजार ३१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासोबतच, १८ एप्रिलपासून नव्या रुग्णसंख्येत होणारी घट कायम आहे, असा दावा देखील मोहोळ यांनी केला आहे. मात्र, अजूनही धोका कायम असून योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम फंडातून घाटीत हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प – खा.डॉ.भागवत कराड
- ‘जे ओबीसीला तेच मराठा समाजाला’ या तत्त्वावर फडणवीस सरकारने सवलती दिल्या !
- ‘कुठून हे नग मिळतात?’, माजी मुख्यमंत्र्यांवर जितेंद्र आव्हाड संतापले
- मानलं गड्या ! कॅन्सर पीडित चिमुकल्यानं केली कोरोनावर मात; डॉक्टरांसह नर्सनी केला ‘असा’ जल्लोष
- ‘..पेट्रोल भरायला गेलो तरी तिथेही फोटो असतो’, अजित पवारांचा मोदींना चिमटा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

