मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारला विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून अडचणीत आणले आहे.सध्या राज्यात फोन टॅपिंग प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. दरम्यान आता कॉंग्रेसचे नेते व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे खासदार असताना नाना पटोलेंचे फोन टॅप झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अमजद खान यांच्या नावानं पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला. याशिवाय त्यांच्या ४ सहकाऱ्यांचे फोनदेखील टॅप करण्यात आले अशी माहिती समोर आली. यासंबंधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. फोन टॅपिंग होत असताना त्यावेळी राज्यात कोणाचं सरकार होतं, असा सवाल नाना यांनी उपस्थित केला आहे.
प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य असतं. कोणीही कोणाच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाही. सरकारच्या परवानगीशिवाय कोणाचेही फोन टॅप केले जाऊ शकत नाहीत. महाराष्ट्राचा गुजरात करण्याचा प्रयत्न केला जात असून माझा फोन टॅप केला गेला, त्यावेळी राज्यात कोणाचं सरकार होतं, असा प्रश्न यावेळी नाना पटोलेंनी विचारला आहे. नाना पाटोळे यांनी केलेल्या दाव्यावर आता भाजप कोणती भूमिका घेणार आणि या आरोपांना काय प्रतीउत्तर हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- गोडावून मधुन भंगार साहित्य चोरणारी टोळी गजाआड
- सोशल मीडियासाठी काढलेल्या ६ कोटी रुपयांच्या कंत्राटावर अजित पवारांचे मोठे भाष्य,म्हणाले…
- ‘केंद्राने महाराष्ट्रात पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा’, काँग्रेसचा आरोप
- …तर त्यांना बाजूला घेऊन नाराजी सांगेन; कथित नाराजी नाट्यावर अजितदादांच खटक्यावर बोट !
- ठरलं ! स्पुटनिक व्ही लसीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

