Share

‘केंद्राने महाराष्ट्रात पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा’, काँग्रेसचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : पंतप्रधान (पीएम) केअर फंडातून औरंगाबादच्या घाटीला मिळालेल्या १५० व्हेंटिलेटरवरून राजकारण पेटले आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील व भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांच्यात तापलेल्या राजकारणात काल राष्ट्रवादीने उडी घेतली. हे सर्व व्हेंटिलेटर्स निकृष्ट दर्जाचेच असल्याच्या खासदार इम्तियाज जलील यांच्या आरोपाचा राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनीही पुनरुच्चार केला. त्यासाठी तज्ञ डॉक्टरांनी दिलेला अहवालही माध्यमांसमोर मांडला.

यानंतर आता आज काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हाच मुद्दा उचलून धरला आहे. ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांनी नेमलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीला #PMCaresFund अंतर्गत सदर संस्थेला पुरवलेले सर्व व्हेंटिलेटर पूर्णतः निरुपयोगी आढळले. त्यांच्या अहवालानुसार कंपनी तंत्रज्ञदेखील हे दुरुस्त करू शकले नाहीत. हा मोठा घोटाळा आहे.’ असा आरोप सावंत यांनी केलाय.

तसेच केंद्रामार्फत पुरविल्या महाराष्ट्राला पुरवलेल्या सर्व व्हेंटिलेटरची राज्यस्तरीय चौकशी करण्याची आम्ही मागणी करतो. पीएम केअर्सच्या माध्यमातून वाया गेलेला वेळ व जनतेचा पैसा अक्षम्य आहे. मोदी सरकारने देशातील सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना या अपारदर्शक फंडात देणगी देण्यासाठी भाग पाडले.

‘या फंडबाबत माहिती ही दिली नाही किंवा माहितीचा अधिकार लागू केला नाही. पण आता अशा अत्यंत तकलादू व फालतू कंपन्यांना हे कंत्राट कसे आणि का मिळाले हे जनतेला समजलेच पाहिजे. मानवतेकरिता या सर्वात मोठ्या संकटात घोटाळा सोडा पण नफेखोरीचा होऊ देण्याचा विचार करणेही अमानुष आहे. जाहीर निषेध!’ अशा शब्दात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!