Share

‘देशाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू’, संजय राऊतांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना काळात देशाची पार वाताहात झाली आहे. केंद्र सरकार कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यास अपयशी ठरले आहे. देश सध्या रामभरोसे असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अहंकार आणि राजकारण बाजूला ठेवून जर चर्चा केली तर देशातील परिस्थिती सुधारु शकते असा सल्लाही त्यांनी दिलाय.

संजय राऊत मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, भारतात सरकार, प्रशासन, पंतप्रधान, आरोग्यमंत्री आहेत. पण ज्याप्रकारे मृत्यू आहेत, गंगा नदीत हजारोंच्या संख्येने मृतदेह मिळत आहेत, हाहाकार माजला आहे ते पाहता देश रामभरोसे आहे. प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतही परिस्थिती वाईट आहे. तिथेही ऑक्सिजनअभावी लोक मरत आहेत.

त्यामुळे पंतप्रधान, गृहमत्री, आरोग्यंत्री, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अहंकार आणि राजकारण विसरुन एकमेकांशी चर्चा करत एकत्र काम केलं तरच देशातील स्थिती सुधारु शकते. प्रधानमंत्री, केंद्र सरकार जागेवरच आहे पण त्यांचं अस्तित्व दिसायला पाहिजे. अदृश्यपणे काम करुन चालणार नाही.

तसेच ‘महाराष्ट्राने नेहमीच सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने हाताळल्यात. पण विरोधक असो किंवा केंद्रातील कोणी असो, राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात देशात सर्वात उत्तम काम महाराष्ट्रात झाल्याचा दावा राऊतांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!