🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.आता ही उर्वरीत स्पर्धा लवकर सुरु होणार नसल्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या परदेशी क्रिकेटपटू मायदेशी परतले आहेत.
काही विदेशी खेळाडूंना मायदेशी परतण्याआधी मालदीव व दुबईमध्ये ठेवण्यात आले आहे. तेथून त्यांना सरकारची परवानगी मिळल्यानंर त्यांना घरी परतता येणार आहे. दरम्यान, खेळाडू मालदीव व दुबईमध्ये मौज मजा करताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/COzyM7-hweB/?utm_source=ig_web_copy_link
तसेच फगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशीद खान सध्या दुबईत आहे. सध्या कोणतीही स्पर्धा नसल्याने तो दुबईत सुट्टयांचा आनंद घेतोय. आपल्या इन्स्टाग्रामवरच्या काही फोटोजमधून तो सुंदर क्षण व्यतित करत असल्याचं दिसतंय. नुकताच पोस्ट केलेला एक फोटो पाहून इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट हिला देखील हेवा वाटला. तिनेही मी मी दुबईला येऊ का?, अशी मजेशीर कॉमेंट केली आहे. भल्या भल्या बॅट्समनची दांडी गुल करणाऱ्या राशीदची यावेळी डॅनियलने दांडी गुल केली.
महत्वाच्या बातम्या
- बाप होण्याआधी पॅट कमिन्सनं गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट
- केंद्र सरकारच्या या पुढाकाराने मराठा आरक्षणास मोठी मदत मिळेल – चंद्रकांत पाटील
- ‘ई-पास’ शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आडवलं पोलिसांनी ; पहा काय आहे प्रकरण
- फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार – देवेंद्र फडणवीस
- पहिल्याच दिवशी राधेचा धमाका ; दुबईत थिएटरबाहेर रांगा, तर…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

