🕒 1 min read
मुंबई : यावर्षी देखील कोरोनाचं संकट कायम असल्यामुळे सर्वत्र घरी रहूनच रमजान ईद साजरी केला जात आहे. काेरोनाचे संकट असल्याने यावर्षीही रमजान ईदचा सण घरी राहून तसेच शासनाच्या सूचनांचे पालन करून साजरा करावा असे आदेश देखील देण्यात आले आहेत.
मुस्मिम बांधवांमध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून, चंद्रदर्शन झाल्यावर ईद ऊल फितर संपूर्ण जगभरात साजरी करण्यात येते. रमजान महिन्यात तिसावा रोजा झाल्यानंतर जो चंद्र दिसतो, त्याला ईद का चांद मानले जाते. आज शुक्रवारी १४ मे ला सर्वत्र ईद साजरी केली जात आहे. शहरात वर्षानुवर्षे ईदगाह मैदान, तसेच शहरातील मशिदींमध्ये लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज अदा करतात. यंदा मात्र ईदवर करोनाचे सावट पसरले आहे. या पार्श्वभूमीवर घरच्या घरी ईद साजरी केली जात आहे.
In these unprecedented times, let the spirit of Eid bring love, peace and joy to all. Eid Mubarak. Stay safe. ????
— Virat Kohli (@imVkohli) May 13, 2021
दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने ट्विट करत लिहिले, या अभूतपूर्व काळात ईदच्या दिवशी सर्वांना प्रेम, शांती आणि आनंद मिळवून द्या. ईद मुबारक. सुरक्षित राहा’ असे ट्विट विराटने यावेळी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- बाप होण्याआधी पॅट कमिन्सनं गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट
- केंद्र सरकारच्या या पुढाकाराने मराठा आरक्षणास मोठी मदत मिळेल – चंद्रकांत पाटील
- ‘ई-पास’ शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आडवलं पोलिसांनी ; पहा काय आहे प्रकरण
- फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार – देवेंद्र फडणवीस
- WTC साठी जसप्रीत बुमराह-शमी सोबत केली ‘या’ वेगवान गोलंदाजाची निवड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

