🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. या दोन्ही मालिकेसाठीच्या टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.
रवींद्र जाडेजा व हनुमा विहारी या दोघांचे टीम इंडियाच्या कसोटी संघात पुनरागमन झाले असून हार्दिक पांडय़ा व कुलदीप यादव या दोघांनाही या संघात स्थान देण्यात आलेले नाही ‘हार्दिक सध्या गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नाही. इंग्लंडविरुद्ध गोलंदाजीचे ओझे हाताळण्यासाठी त्याला संघात घेण्यात आले होते, मात्र तो प्रयोग फसला.’ त्यामुळेच कसोटी संघात त्याचा विचार झालेला नाही. हार्दिकची जागा ठाकूरला देण्यात आली आहे.
भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीनंतर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूरची निवड केली आहे.
“वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये इंग्लिश उन्हाळ्याच्या पहिल्या सहामाहीत जेव्हा न्यूझीलंडविरुद्ध भारत खेळेल, तेव्हा मी शार्दुल ठाकूर – स्विंग गोलंदाज म्हणून पसंत करेल – जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यासोबत तिसरा वेगवान गोलंदाज असेल,” मांजरेकर यांनी ESPNcricinfo.com ला सांगितले. यापूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुणने अष्टपैलू हार्दिक पांड्याची जागा भरण्यासाठी शार्दूल ठाकूरला पाठिंबा दर्शवला होता.
महत्वाच्या बातम्या
- बाप होण्याआधी पॅट कमिन्सनं गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट
- केंद्र सरकारच्या या पुढाकाराने मराठा आरक्षणास मोठी मदत मिळेल – चंद्रकांत पाटील
- ‘ई-पास’ शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आडवलं पोलिसांनी ; पहा काय आहे प्रकरण
- फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार – देवेंद्र फडणवीस
- केंद्राने कातडी बचाव धोरण स्वीकारू नये, अशोक चव्हाण यांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

