🕒 1 min read
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडिया प्रचारासाठी सहा कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला होता. हे प्रकरण समोर येताच विरोधकांनी हल्लाबोल केल्यानंतर अजित पवार यांनी हा शासन निर्णय रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या खर्चावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीसह शिवसेनेवर प्रहार केला आहे. शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांचं वैर सबंध महाराष्ट्राला ठाऊक आहे. अशातच, शिवसेनेनं भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन केल्यापासून राणे कुटुंबीयांनी आरोपांची व टीकांची सरबत्ती केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शिवसेनेवर नितेश राणे यांनी गंभीर आरोप केला आहे. दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान अख्तर यांना ट्विट करण्यासाठी शिवसेना भवनातून फोन जातो. तसेच त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
त्यांच्या या आरोपांना शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘राणेंनी फक्त कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरून आरोप करू नये. ते सिद्ध करून दाखवावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांचं ऐकतात. त्यांचंही ऐकतील. असे कोणते सेलिब्रिटी आहेत ज्यांच्यावर दबाव टाकला जातोय ? दबाव टाकून जर सेलिब्रिटी काय करत असतील तर त्या सेलिब्रिटींनी समोर येऊन तक्रार करावी. आमच्यावर दबाव येतोय असं सांगावं. राणेंनी हवेत शब्दाचे खेळ करू नयेत,’ असा टोला पेडणेकर यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते नितेश राणे ?
‘या सरकारने रिक्षावाल्यांचे १५०० रुपये अजून दिलेले नाहीत. गहू, तांदूळ देणार होते त्याचा एक दानाही मिळालेला नाही. साडेपाच हजारांचं पॅकेज जाहीर केलं होतं त्याचं काहीही झालेलं नाही, एक रुपयाही मिळालेला नाही. दुसरीकडे सहा कोटी खर्च होत आहेत. हे पैसे फक्त उपमुख्यमंत्री खर्च करत नाही आहेत. महाराष्ट्र सरकारने अनेक खासगी एजन्सींना नेमलं आहे. रेन ड्रॉप नावाची एजन्सी आहे, ज्यामार्फत दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान अख्तर यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिले जात आहे. काही लोकांना तर शिवसेना भवनमधून फोन केले जात आहेत. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. छोटे कलाकार असतील तर दोन-तीन लाख आणि मोठे असतील तर १०-१५ लाख इतके पैसे दिले जात आहेत,’ असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- दोस्ताना नंतर कार्तिकच्या हातात बिग बजेट सिनेमा ; मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम
- …तर एक जबाबदार राज्य म्हणून तो आपला पराभव ठरेल; न्यायालयाची राज्य सरकारला चपराक !
- अन् ‘शक्तिमान’ हादरला; आधी स्वतः मृत झाल्याच्या अफवा नंतर बहिणीच्या मृत्यूची वार्ता !
- गडकरींनी शब्द पाळला; वर्ध्यात निर्मित झालेल्या रेमडेसिवीरचा पहिला स्टॉक बाहेर !
- ‘बिनपगारी प्रवक्त्यांनी पवार साहेबांविरुद्ध कितीही ओरड केली तरी…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

