Share

‘सेंट्रल व्हिस्टा’ची रक्कम आरोग्य क्षेत्रासाठी वापरण्याची मागणी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नवे संकट उभे ठाकले आहे. या स्थितीत केंद्र सरकारने मोफत लसीकरण मोहीम राबवावी, सेंट्रल व्हिस्टासारख्या प्रकल्पासाठी खर्च केली जात असलेली रक्कम हे काम थांबवून आरोग्य क्षेत्रासाठी वापरावी, बेरोजगारांना मासिक ६ हजार रुपये द्यावेत, अशा एकूण ९ मागण्यांचे खुले पत्र १२ विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना लिहिले आहे.

या खुल्या पत्रावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह १२ विरोधी पक्षनेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणीही यात आहे. विरोधी पक्षांनी यापूर्वीही काही सल्ले दिले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचे परिणाम आता देश भोगत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पत्रात करण्यात आलेल्या मागण्या
केंद्रीय स्तरावर लस खरेदी करुन प्रत्येकाला लस देण्याची मोहीम सुरू करा तसेच सक्तीच्या परवान्याद्वारे देशात लस उत्पादन वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या 35 हजार कोटीतून लसीकरणावर खर्च करावा.सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प थांबवा आणि वाचलेली रक्कम ऑक्सिजन आणि लसींवर खर्च करा अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

पीएम केअरमध्ये जमा केलेली रक्कम ऑक्सिजन, लस, औषध, वैद्यकीय उपकरणांवर खर्च करा. सर्व बेरोजगारांना दरमहा 6 हजार रुपये द्या, गरजू लोकांना मोफत धान्य द्यावे. कोरोनाला बळी पडणाऱ्या आंदोलनशील शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी कृषी सुधार कायदे मागे घ्या अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!