🕒 1 min read
नवी दिल्ली- जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना विषाणूच्या B.1.617 या प्रकाराचा समावेश चिंताजनक प्रकारामध्ये केल्याचं वृत्त अनेक प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झालं आहे. यापैकी काही माध्यमांनी B.1.617 हा कोरोना विषाणू हा “भारतीय प्रकार” असल्याचं म्हटलं आहे. मात्र, या विषाणूला भारतीय प्रकार म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आणि निराधार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना विषाणूच्या B.1.617 या प्रकाराविषयी दिलेल्या आपल्या 32 पानी अहवालात हा प्रकार भारतीय असल्याचं कुठेही म्हटलेलं नाही. प्रत्यक्षात या अहवालात “भारतीय” हा शब्दच वापरलेला नाही असं मंत्रालयानं स्पष्ट आज केलं.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकानं काल नवी दिल्लीच्या छतरपूर भागात पाचशे खाटा असलेल्या सरदार पटेल कोविड निगा केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या केंद्राचं व्यवस्थापन पाहणाऱ्या इंडो तिबेट सीमा पोलिस दलातले डॉक्टर्स आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून; या पथकानं त्यांची प्रशंसा केली. तिथल्या उपचार पद्धती, नियम आणि व्यवस्थापनाचा देखील आढावा घेतला. या कोविड निगा केंद्रात सध्या साडे तीनशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! सीएसकेचा ‘हा’ प्रशिक्षक पुन्हा कोरोनाबाधीत
- ६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीलाही आता मिळणार प्राधान्य
- ‘मी खरंच इतका वाईट आहे का?’ सतत डावलल्यामुळे कुलदीप यादवने बोलुन दाखवली खंत
- पुण्यात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा २ हजारांच्या आत तर कोरोनामुक्तांच्या आकड्यात वाढ
- ‘पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे नियोजन करायला हवे होते ते केले नाही’

