Share

वैजापूरसह, कन्नड, गंगापूर, पैठण तालुके ठरत आहेत कोरोना हॉटस्पॉट!

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ग्रामीण भागासाठी अधिक धोकादायक ठरत आहे. प्रामुख्याने नगरच्या दिशेने असलेल्या वैजापूर, कन्नड, गंगापूर आणि पैठण हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असून या भागात दररोज ५० ते ९० हून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. शिवाय मृत्यूचे प्रमाणही या तालुक्‍यांमध्ये सर्वाधिक असल्याची माहिती आकडेवारीतून पुढे आली आहे.

जिल्ह्यात एकीकडे महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या अधिक तीव्रतेने वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय यंत्रणेने संपूर्ण लक्ष या तालुक्याकडे केंद्रित केलेले आहे. शहरातील पॅटर्न ग्रामीण भागात वापरून सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांमार्फत बाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. यात सरपंच आणि ग्रामसेवकांवर अधिक जबाबदारी टाकण्यात आली आहे.

असे असतांनाही जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर, आणि कन्नड हे कोरोनाचे हॉटस्पॉट तालुके ठरत आहेत. चार दिवसात यामध्ये अधिकच वाढ झाली असून शुक्रवारी कन्नड तालुक्यात तब्बल एकशे दहा रुग्ण आढळले तर वैजापूर मध्ये ११४ आणि पैठण मध्ये १०७ आणि गंगापूर मध्ये ९० रुग्ण आढळले होते तर शनिवारी दिवसभर गंगापूर मध्ये ७५ वैजापूर मध्ये तब्बल १०३ पैठण ९० तर कन्नडमध्ये ७८ रुग्ण आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. याशिवाय रविवारी वैजापूर मध्ये दिवसभरात तब्बल एकशे पंचवीस नव्या रुग्णांची भर पडली आहे तर पैठणमध्ये ९२ आणि कन्नड मध्ये ६७ रुग्ण आढळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!