Share

जायकवाडी प्रबोधनी येथील कोरोना सेंटरमध्ये घाणीचे साम्राज्य! कोरोनाग्रस्त रुग्णांनीच केला परिसर स्वच्छ

Published On: 

औरंगाबाद : एकीकडे पैठण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासन एकजुटीने कोरोनाचा सामना करत आहे. तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्ण व क्वॉरांटाईन केलेल्या व्यक्तींना जायकवाडी येथील प्रबोधिनी येथे तयार केलेल्या कोरोना सेंटरमध्ये ठेवण्यात येते. तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे कक्षातील रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पैठण तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात देखील कोरोनाने शिरकाव केल्यामुळे कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना जायकवाडीतील प्रबोधीनी या ठिकाणी ठेवण्यात येते. मात्र येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले.

त्याचप्रमाणे या ठिकाणी घाण, पिपिई किट, जेवणाच्या पंतरवाळी असा कचरा सर्वत्र पसरलेला दिसून येत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यामध्ये वेळीच सुधारणा करून रूग्णांना चांगली सेवा द्यावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांसह रुग्णांनी केली आहे.

दरम्यान, कोरोना ग्रस्त रुग्णांनीच त्रास होत असल्याने शेवटी मनाचा मोठेपणा दाखवत सर्व परिसर स्वच्छ करुन सेंटर वरील सर्व कचरा काढून टाकला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!