🕒 1 min read
बीड: जिल्ह्यात कोरोनाची लाट कमी होण्याचं काही नाव घेत नाहीये. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णांची वाढ व त्याच सोबत वैद्यकीय सुविधांचा तुटवडा या मुळे रुग्णांची हाल होत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत नागरिकांचा लसीकरणाकडे कल वाढलेला दिसत आहे. तसेच जिल्ह्यात ऑक्सिजनचा देखील तुटवडा जाणवत होता मात्र आता जिल्ह्यात ३७१ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स मिळाले आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळण्यास मदत होणार आहे.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला ऑक्सिजनचा मोठा बूस्टर प्राप्त करून दिला असून ३७१ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स प्राप्त झाले आहेत.
मागील आठवड्यात पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हा रुग्णालयाला ३० बायपॅप मशीनसह २९ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर आज प्राप्त ३७१ कॉन्संट्रेटर्ससह आता कॉन्संट्रेटर्सची एकूण संख्या ४०० झाली आहे.
हे कॉन्संट्रेटर्स जिल्हा रुग्णालयासह अन्य शासकीय रुग्णालयांत आवश्यकतेनुसार वितरित करण्यात येणार आहेत. हवेतून ऑक्सिजन वेगळा करण्याची क्षमता असलेले ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स म्हणजे या कठीण परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी संजीवनी म्हणावी लागेल, अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यासह राज्यभरात आहे. त्यामुळे पालकमंत्री मुंडेंच्या माध्यमातून जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झालेले हे ३७१ व पूर्वीचे २९ असे ४०० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स अनेक कोरोनाबाधित रुग्णांचे जीव वाचवण्याच्या कामी सहायक ठरणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोरोनामुळे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे विमा योजनेचा लाभ द्या’, शिवसंग्रामची मुख्यमंत्र्यांकडे मागणी’
- पत्रकारांच्या सुरक्षेची काळजी घेणं हे आपले कर्तव्य ; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करा-काँग्रेस
- रेमडेसिवीरच्या धर्तीवर म्युकोरमायकोसिसच्या इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये याची दक्षता घ्या – खा. भागवत कराड
- मैदाने आणि जॉगिंग ट्रॅक खुली करा; आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. मकरंद जोशी यांची मागणी


