Share

रेमडेसिवीरच्या धर्तीवर म्युकोरमायकोसिसच्या इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये याची दक्षता घ्या – खा. भागवत कराड

Published On: 

औरंगाबाद : राज्यात शहर आणि ग्रामीण मध्ये कोरोना संसर्ग नियंत्रित होत असला तरी, नव्याने म्युकोरमायकोसिस हा नवीन आजार समोर आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात रुग्णामध्ये सापडत आहेत. रुग्णांना या आजारावर उपचारासाठी महागडे इंजेक्शन उपलब्ध आहे. रेमडेसिवीरच्या धर्तीवर पुन्हा याही, इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये म्हणून उपाय योजना कराव्या. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने औषधाच्या काळाबाजारवर नियत्रण मिळवून रुग्णावर उपचार करावेत, अशी मागणी खा. डॉ. भागवत कराड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

म्युकोरमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. ब्लॅक फंगस म्हणून देखील तो काही देशांमध्ये ओळखला जातो. या आजाराचे वैशिष्ट्य असे की नाक, डोळे, मेंदू शरीराच्या अवयावर परिणाम होत आहे. काही रुग्णांच्या दृष्टीवर ही परिणाम झालेला आहेत. गेल्या दहा पंधरा दिवसापासून म्युकोरमायकोसिस आजाराचे रुग्ण राज्यातील मोठ्या शहरांमध्ये वाढताना दिसत आहेत.हा आजार रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करतो. यापूर्वी केमोथेरपी, मधुमेह रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये या आजाराची लक्षणे दिसायची पण, सध्या करोना रुग्णांमध्ये ही या आजाराची मोठ्या प्रमाणात लक्षणे दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहेत.

बुरशीमुळे डोळ्यांना सूज येते एक किंवा दोन दिवसात डोळ्यांचा प्रकाश कमी होत आहे. त्यामुळे रुग्णांची दृष्टी कमी होत आहे. याशिवाय नाकातून जाड किंवा पातळ स्राव होऊन नाकाच्या आजूबाजूला सूज येणे, डोकेदुखी, डोळे दुखणे या आजाराची काही लक्षणे आहेत. अगोदरच कोरोना रुग्णांची प्रतिकारशक्ती  कमी झाली असताना. म्युकोरमायकोसिस आजार होण्याची जास्त शक्यता आहेत. कोरोनाचे मोठे संकट दूर होत असताना आता नव्याने म्युकोरमायकोसिस या आजारामुळे नागरिकत भीतीचे वातावरण निर्माण झाले.

त्यामुळे या आजारावर ती राज्य सरकारने तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहेत विशेष बाब म्हणजे या रुग्णांना दिली जाणारी औषधे आणि इंजेक्शने ही महागडी आहे, अम्फोटेसीरीन, ओकटाप्लेक्स ,अम्फोनेक्स अम्फोलीप इत्यादी औषधाचा काळा बाजार होत असल्याने सामान्य रुगाना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे  म्युकोरमायकोसिसच्या इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घावी. अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!