Share

‘गंगेच्या किनारी विखुरलेल्या अवस्थेत पडलेले मृतदेह पाहून मनाला खूप वेदना झाल्या…!’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : सध्या भारतात कोरोना रुग्णांची मोठ्याप्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. अशातच, भरमसाठ होत असलेल्या रुग्णवाढीमुळे भारतातील आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे.

देशातील परिस्थिती भीषण बनत चालली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यासाठी जागा देखील मिळत नसल्याचे चित्र आहे. बिहार, उत्तर प्रदेश मधून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गंगेच्या किनारी करोना रुग्णांचे मृतदेह वाहून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे प्रशासन चिंतेत आहे.

बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी लागलेला मृतदेहांचा ढीग पाहून गावकरीदेखील घाबरले आहेत. हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. संबंधित करोना रुग्णांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी किंवा दफन करण्यासाठी जागा मिळाली नसावी असा अंदाज आहे.

दरम्यान, आता याच मुद्द्याचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील पडताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार वंदना चव्हाण यांनी याच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर तोफ डागली आहे.आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात, जिवंतपणी मरणयातना आणि मृत्यूनंतरही सुटका नाही….! अंत्यविधीसाठी स्मशानातही जागा मिळत नसल्याने बिहारमध्ये गंगेच्या किनारी विखुरलेल्या अवस्थेत पडलेले हे मृतदेह पाहून मनाला खूप वेदना झाल्या…! बिहारमधील एकंदरीत परिस्थिती अत्यंत भीषण आहे  असे त्यांनी म्हटले आहे.

विकलांग आरोग्य व्यवस्था, अकार्यक्षम प्रशासन आणि संवेदहीन सरकार हे या परिस्थितीला कारणीभूत असल्याचे जाणवते. वास्तविक चाचण्या वाढवणे, त्वरीत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे अपेक्षित असताना स्थानिक प्रशासन आणि सत्ताधारी यात कमी पडताना दिसत आहे.त्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ ची घोषणा ही केवळ वल्गनाच ठरत आहे हे पुन्हा एकदा या घटनेमुळे सिध्द झाले आहे अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!