Share

ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर

Published On: 

पुणे –पुणे विभागात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. यामुळेच आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याचे देखील पाहायला मिळत असून अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा देखील तुटवडा जाणवत होता. मात्र आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुणे शहरात पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस बुधवारी मध्यरात्री दाखल झाली आहे.

55 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन असलेले 4 टँकर पुण्यातल्या लोणी स्टेशनवर बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दाखल झाली. ओरिसातल्या अंगुल येथून ही ऑक्सिजन एक्सप्रेस पुण्यातल्या लोणी येथे दाखल झाली आहे. या एक्सप्रेसने 37 तासांत तब्बल 1हजार725 किलोमीटर अंतर कापले आहे. यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता. आणि रो रो सेवेद्वारे हे ऑक्सिजन टँकर आणण्यात आले.

महाराष्ट्रात दाखल होणारी ही पाचवी ऑक्सिजन एक्सप्रेस आहे. तर पुण्यासाठी पहिलीच ऑक्सिजन एक्सप्रेस आहे.अंगुल इथून सोमवारी सकाळी साडेदहा वाजता चार टँकर नागपूरच्या दिशेने रवाना झाले. मंगळवारी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी नागपूर स्थानकवर गाडी दाखल झाली.

क्रू बदलून तात्काळ ही गाडी लोणीसाठी 6 वाजून 30 मिनिटांनी मार्गस्थ झाली. गाडीला ग्रीन कॉरिडॉर असल्याने मार्गात गाडीला सर्वच सिग्नलवर ग्रीन सिग्नल देण्यात आला. त्यामुळे गाडीची गती जरी कमी असली तरीही ग्रीन कॉरिडॉरमुळे वेळेत मोठ्या प्रमाणात बचत झाली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!