मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत दिली. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळानं आरक्षणाच्या प्रश्नाबाबत काल राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींकडे आहे असं सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल देताना म्हटलं होतं. या निकालावर आमच्या भावना कळविण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली असून, लवकरच यासाठी पंतप्रधानांचीही भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.या शिष्टमंडळात मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेत्यांचा सहभाग होता.
दरम्यान,या घडामोडी घडत असताना आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत. भाजपने या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ध्यानात घेऊन, राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीसह पुढचे पाऊल टाकायला हवे होते. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल केली.
महत्त्वाच्या बातम्या
- त्यावेळी धीर देत विराटने मीठी मारली; सिराजने सांगितली ‘ती’ आठवण
- शांत स्वभावाचा हनुमा विहारी भडकला, ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर
- एकाच वेळी भारताचे दोन संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यीची ही दुसरी वेळ, २३ वर्षानंतर आला पुन्हा योग
- विनाकारण फिरणाऱ्या १११ नागरिकांपैकी ६ निघाले ‘कोरोना स्प्रेडर’!
- नव्या संसद भवनाचे काम थांबवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिक दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

