मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दौऱ्यात भारताने सलामीवीर म्हणून रोहित शर्माच्या जोडीला शुभमन गील आणि मंयक अग्रवाल यांना निवडण्यात आले. तर राखीव खेळाडुमध्ये समावेश झालेला अभिमन्यु इश्वरन हाही एक सलामीवीरासाठी पर्याय म्हणुन उपलब्ध होउ शकतो.
मात्र या संघात भारताकडुन कसोटी सामन्यात चमकदार कामगीरी करणाऱ्या काही खेळाडूंना डावलले आहे. या खेळाडूसाठी भारतीय कसोटी संघाची वाट खडतर बनली आहे. यात पहिले नाव येते ते शिखर धवनचे. शिखर हा एकवेळ संघाचा नियमीत सलामीवीर म्हणून खेळायचा. पदार्पनाच्या सामन्यात शतक झळकावत शिखरने बराच काळ भारतीय कसोटी संघात सलामीवीर म्हणून भूमिका बजावली आहे. मात्र २०१८ मध्ये खराब कामगिरीमुळे संघाबाहेर झाल्यानंतर शिखर धवन पुन्हा कसोटी संघात दिसलाच नाही. ३५ वर्षाच्या शिखरला संधी मिळणे कठिणच आहे.
तर भारताकडून विरेंद्र सेहवागनंतर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा दुसरा खेळाडू करुण नायरलाही भारतीय संघात पुनरागमन करणे शक्य नाहीये. आपल्या छोट्या कारकिर्दीत करुनने त्रिशतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधुन घेतले होते. मात्र ६ कसोटी सामन्यात एका त्रिशतकासह करुणने केवळ ३७४ धावा केल्या आहे. यावरुन समजते की त्याला पु्न्हा संधी मिळण्याची शक्यता किती कमी आहे. सध्या भारताकडून कसोटीत सलामीवीर म्हणून रोहित शर्मा, शुभमन गील, पृथ्वी शॉ आणि के एल राहुल ही नावे आघाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- भारतीय खेळाडुंना बायोबबलच्या नियमात रहायला आवडत नाही; मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाचा खळबळाजनक आरोप
- कर्णधार डेव्हिड वॉर्नरच सनरायझर्स हैदराबादच्या अपयशाला जबाबदार, इरफान पठानने व्यक्त केले मत
- त्यावेळी धीर देत विराटने मीठी मारली; सिराजने सांगितली ‘ती’ आठवण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

