Share

भारतीय खेळाडुंना बायोबबलच्या नियमात रहायला आवडत नाही; मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाचा खळबळाजनक आरोप

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासु कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या शिरकावामुळे स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. या स्पर्धेत अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येताच स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला.

आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर या स्पर्धेतील मुंबई इंडियन्स संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक जीम्मी पॅमेंट यांनी एक खळबळाजनक वक्तव्य केले आहे. पॅमेंट म्हणाले की, ‘बीसीसीआयने स्पर्धेदरम्यान काही भारतीय खेळाडूंना बायोबबलमध्ये लादलेल्या नियमानुसार रहायला आवडत नाही. मात्र मला स्वत:ला बायोबबलमध्ये एकदम सुरक्षित वाटत होते. माझ्या अनुभवानुसार बायोबबलमध्ये खेळाडुच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करण्यात येत नाही.’

यावेळी पुढे बोलताना पॅमेट म्हणाले की,’मात्र ज्यावेळी सीएसकेच्या संघातील काही सदस्याना कोरोनाची लागण झाल्याचे समजले तेव्हा मात्र आम्हाला काही प्रमाणात भीती वाटली होती. कारण काही दिवसापुर्वीच आम्ही सीएसकेसोबत सामना खेळलो असल्याने त्यांच्या संपर्कात आलो होतो.’ असे म्हणाले. जीम्मी पॅमेंट हे गेल्या २ वर्षापासुन मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदाची धुरा संभाळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!