मुंबई : आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने तत्काळ स्पर्धा स्थगित केली. या स्पर्धेत गुणतालीकेत सर्वात खाली सनरायझर्स हैदराबादचा संघ होता. हैदराबादच्या संघाने स्पर्धेत ७ सामने खेळताना केवळ एका सामन्यात विजय मिळवत सहा सामन्यात पराभवाचे तोंड पाहिले होते.
यादरम्यान हैदराबाद संघ व्यवस्थापनाने खराब कामगीरीमुळे कर्णधार डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदावरुन उचलबांगडी केली होती. यावरुन हैदराबाद संघ व्यवस्थापनावर विविध स्थरातुन टिका करण्यात आली होती. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटु इरफान पठानने हैदराबाद संघाच्या खराब कामगीरीसाठी कर्णधार डेव्हिड वॉर्नरच जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीती त्याने हे वक्तव्य केले. यावेळी तो म्हणाला,’संभाव्य विजेता म्हणून एक संघ ओळखला जाणारा हैदराबाद संघाच्या अपयशाचे मोठे कारण त्यांचे नेतृत्व हेच होते.’ असे म्हणाला
यावेळी पुढे बोलताना तो म्हणाला की,’स्पर्धेत ज्याप्रकारे वॉर्नर फलंदाजी करत होता, नेतृत्व करत होता. त्यामुळे संघाच्या अडचणीत वाढ झाली होती. त्याच्या कामगीरीवर खुश नसल्यानेच संघ व्यवस्थापनाने केन विल्यमसनकडे नेतृत्व दिले होते.’ हैदराबादच्या आखेरच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या जागी नेतृत्व हे केन विल्यमसनने केले होते. तर आखेरच्या सामन्यात वॉर्नरला संघात स्थानही दिले नव्हते. तरिही या सामन्यात हैदराबाद संघाचा पराभव झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- त्यावेळी धीर देत विराटने मीठी मारली; सिराजने सांगितली ‘ती’ आठवण
- शांत स्वभावाचा हनुमा विहारी भडकला, ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर
- एकाच वेळी भारताचे दोन संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यीची ही दुसरी वेळ, २३ वर्षानंतर आला पुन्हा योग
- विनाकारण फिरणाऱ्या १११ नागरिकांपैकी ६ निघाले ‘कोरोना स्प्रेडर’!
- नव्या संसद भवनाचे काम थांबवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिक दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

