🕒 1 min read
मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित झाली. ही स्पर्धा स्थगित होताच काहीच दिवसात बीसीसीआयने जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र यादरम्यान बीसीसीआयने जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौराही आयोजीत केला आहे.
मात्र कोरोना नियमामुळे भारतीय संघ इंग्लंडवरुन श्रीलंकेला येत मालिका खेळुन परत इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळायला जाणे शक्य नाही. त्यामुळे बीसीसीआयने यावर उपाय शोधताना श्रीलंका दौऱ्यासाठी अशा भारतीय संघाची निवड करण्याचे ठरवले आहे. जो संघ इंग्लंड दौऱ्याचा भाग नसणार आहे. याचा अर्थ असा होतो की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच वेळी भारताचे दोन क्रिकेट संघ खेळणार आहे. यापुर्वी २३ वर्षापुर्वी १९९८ मध्येही असेच एकदा घडले होते.
१९९८ मध्ये राष्ट्रकुल खेळामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. आणि त्यादरम्यान भारतीय संघाला कॅनडामध्ये सहारा कप खेळायला जायचे होते. त्यामुळे त्यावेळीही बीसीसीआयने दोन क्रिकेट संघाची बांधणी केली होती. राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत पाठवलेल्या संघाचे कर्णधारपद अजय जडेजाकडे देण्यात आले होते. तर या संघात सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस लक्ष्मण, हरभजन सिंग, रॉबीन सिंग, अनिल कुंबळे या खेळाडुंचा समावेश होता. तर सहारा कप स्पर्धेत मोहम्मद अझरुद्दीनच्या संघात सौरव गांगुली,नवज्योतसिंग सिद्धु, राहुल द्रविड, जवागल श्रीनाथ या खेळाडुंचा समावेश होता. २३ वर्षानंतर हा योग पुन्हा जुळुन आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- विनाकारण फिरणाऱ्या १११ नागरिकांपैकी ६ निघाले ‘कोरोना स्प्रेडर’!
- नव्या संसद भवनाचे काम थांबवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिक दाखल
- अशोक चव्हाण करणार देशभरातील विधानसभा निवडणूक निकालांची समीक्षा
- ‘सहा-आठ महिने भरपूर शिव्या दिलेल्या राज्यपालांना नम्रपणे भेटायला जाणे म्हणजे…’
- सलाम मुंबईकर ; सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या २ हजारांखाली


