औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजेच मिनीघाटीमध्ये रखडलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे प्रतिकात्मक उद्घाटन भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन यांच्या दिरंगाईमुळे हा प्रकल्प रखडला असून यामुळे कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यास अडचण होत असल्याचा आरोप केनेकर यांनी केला आहे.
कोरोनाच्या माहामारीमध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार सर्व जिल्ह्यांना सहा ते सात महिन्यापासून विविध उपाययोजना करण्यासाठी सुचवत आहेत. त्या उपाययोजना स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन यांच्या अधिकार्यांनी करणे अपेक्षित आहे, परंतु शहर वासीयांना अजून ऑक्सिजनची किती वाट पहावी लागणार आहे, असा प्रश्न केनेकर यांनी उपस्थित केला.
केंद्र सरकारच्या योजनेमधून मंजूर झालेले ऑक्सीजन प्लांट हे कागदावर टेंडर देऊन कागदपत्रे करण्याचा घाट प्रशासन करत आहे. असे नसते तर सहा महिन्यांपूर्वी एखाद्या शासकीय कामाचा आदेश निघून ते काम महामारी मध्ये जर उपयोगी येत नसेल तर, त्याचा काय उपयोग, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या शासकीय अधिकारी पदाधिकारी यांच्या दप्तर दिरंगाई मुळे व ‘शासकीय काम आणि सहा महिने थांब’ या ध्येय धोरणामुळे जिल्ह्यामधील व मराठवाड्यामध्ये जनता मृत्यूच्या दरीमध्ये लोटली जात असल्याचेही ते म्हणाले. या सर्वांमुळे यात मोठा भ्रष्ट्राचार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- छोटा राजनने केली कोरोनावर मात; रुग्णालयातून तिहार जेलमध्ये रवानगी
- हृतिक रोशनच्या कुटुंबाने कोरोनाच्या भीतीमुळे मुंबईतून हलवला आपला मुक्काम !
- ‘जायचंय पंढरपूरला पण गाडी निघाली गोव्याला, मराठा आरक्षणाचा आघाडी सरकारकडून खेळखंडोबा’
- कोरोना मृत्यूचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच नाही का ? – आशिष शेलार
- औरंगाबादसह राज्यात एफसीआयचे दोन विभागीय कार्यालये, केंद्रीय मंत्री दानवे यांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

