Share

मुंबईत ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणीत भ्रष्टाचार? भाजपने केली चौकशीची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सर्व स्तरावर उपाययोजना करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतेच शहर उपनगरात ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी निविदा काढल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया प्रशासकीयदृष्ट्या पारदर्शी नसून या सारख्याच प्रकल्पासाठी वसई- विरार महानगरपालिकेने काढलेल्या निविदेपेक्षा बृहन्मुंबई महापालिका दुप्पट अधिक खर्च करत असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकल्पात भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याने त्याची सखोल चौकशी महानगरपालिका आयुक्तांनी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षनेता विनोद मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी सर्व पातळ्यावर स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न होत आहे. त्याचाच भाग म्हणून वसई- विरार महानगरपालिकेनेही निविदा प्रक्रिया काढल्या आहेत. यातील टेक्नोमेट निविदाकाराचा दर हे मुंबई महानगरपालिका प्रशासनातील निविदा प्रक्रियेतील दरांच्या तुलनेत कमी आहे. त्याच ऑक्सिजन प्लांट उभारणी प्रकल्पाकरिता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दुप्पट अधिक खर्च करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे असे भाजपने म्हटले आहे.

आॅक्सिजन निर्मिती तातडीने युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे म्हणूनच यावर तातडीने चौकशी व कार्यवाही करावी जेणेकरुन योग्य दरास आणि दर्जात्मक आॅक्सिजन पुरवठा मुंबईकरांस त्वरित झाला पाहिजे असे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!