🕒 1 min read
मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण आला आहे. अनेक लोक आपला जीव गमावत आहेत. याला अनेकजन सरकारला जबाबदार ठरवत देशातील या व्यवस्थेवर विविध स्तरावरून असंतोष व्यक्त केला जात आहे. नुकतीच अभिनेत्री राखी सावंतने देखील या परिस्थितीबाबत सरकार आणि मंत्रिमंडळावर रोष व्यक्त केला आहे.
https://www.instagram.com/tv/COsqyoQnN-q/?utm_source=ig_web_copy_link
तिचा एक व्हिडिओ समोर आला असून ज्यात ती म्हणते की, ‘देशाच्या जनतेकडे लक्ष न देणा-या राजकारण्यांचा धिक्कार असो. ज्या लोकांनी तुम्हाला इतक्या विश्वासाने निवडून दिले, त्याच लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात. स्वत: अमेरिकेत जाऊन तुम्ही चांगल्या प्रतीची व्हॅक्सिन घेतली आणि लोकांना वा-यावर सोडले. देश चालवणे म्हणे काय? फक्त बाता मारणे? तुमच्या हातात सत्ता आहे. तुम्ही कुठूनही ऑक्सिजन आणू शकता. आणि जर तुम्हाला देश चालविणे जमत नसेल तर राजीनामा द्या ना. मी तर म्हणेन, सोनू सूदला देशाचा पंतप्रधान केले पाहिजे. सलमान खानसुद्धा मदत करत आहे, त्याला पंतप्रधान बनवा. मंत्री तर सध्या केवळ डिबेट करत आहेत. आम्हाला तुमचे डिबेट नको. आम्हाला तुमची भाषणबाजी नको. आम्हाला व्हॅक्सिन हवी, आम्हाला बेड्स हवेत, आम्हाला ऑक्सिजन हवा आहे’.
पुढे रडत ती म्हणते की, सध्या देशाची स्थिती भीषण आहे. लोकांचे जीव जात आहेत. मी रात्ररात्रभर झोपू शकत नाहीये. मी स्वत: देशाची स्थिती बघतेय. माझ्या देशातील लोक किड्या मुंग्यासारखे मरत आहेत. ही तर दुसरी लाट आहे. आता तिसरी लाट येणार आहे. ती लहान मुलांवर येणार आहे. त्या आईबापांची काय स्थिती होणार? असे बोलताना राखी भावुक झाली असल्याचे या व्हिडिओ मधून दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘युवराज आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम पूर्णतः बोगस व बेगडी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले’
- जगभरात गाजतोय निलेश लंकेचा डंका; परदेशातून मिळतेय कोविड सेंटरला मदत
- कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी जमली तुफान गर्दी
- जालनावासियांची होणार खड्ड्यांतून मुक्तता, रस्त्यांसाठी ५ कोटी ५५ लाखांचा निधी मंजूर
- केवीन पीटरसनने केले हिंदीमध्ये ट्विट ; चाहते म्हणाले, ‘इमोशनल कर दिया यार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

