Share

महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचे २ हजार बाधित रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू : आरोग्यमंत्री

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

महाराष्ट्रात अशी भीषण परिस्थिती असतानाच आता राज्यावर म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. या आजाराबाबत नागरिकांनी सर्तकता बाळगण्याची गरज असून, लवकरच या आजाराचे उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतुन केले जाणार आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच राज्यात म्यूकरमायकोसिसची लागण झाल्याचे २ हजार रुग्ण आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

म्यूकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून, या आजारासाठीचे १४ इंजेक्शन घ्यावे लागतात. या इंजेक्शनचे दर महाग असल्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या आवाक्याबाहेर खर्च जात आहे. त्यामुळे या आजारावरील उपचार जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

काय आहे हा आजार? :

म्यूकरमायकोसिस हा बुरशीमुळे होणारा आजार असून, बुरशी हवेतून पसरते. त्याचा संसर्ग झाल्यास नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत बुरशी साठून राहते. कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन दिला जातो. तेव्हा त्या ऑक्सिजनमधील पाणी शुध्द असले पाहिजे. पाणी शुद्ध नसल्यास हा बुरशीजन्य आजार म्हणजेच म्युकरमायकोसिसची लागण होते. अशा व्यक्तींत नाकातून रक्त येणे, चेहरा एका बाजूने दुखणे, मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी, छातीत दुखणे, डोळ्यांना त्रास होणे, एकच दृश्य दोनदा दिसणे आदी प्रकारची लक्षणे आढळून येतात. कोव्हिडच्या आजारातून बरे झालेल्यांपैकी काहींना ही लक्षणे दिसल्याने उपचार करावे लागल्याचे डॉक्टरांनी मुंबई, दिल्ली आदी ठिकाणच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. बुरशीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!