लातूर: कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोविड केअर सेंटरची संख्या देखील वाढवण्यात येत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत असल्याने नव्याने बाधित झालेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. तसेच अपुऱ्या वैद्यकीय सेवांमुळे देखील जिल्ह्यात रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या देखील अनेक तक्रारी येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्ह्यातील औसा व लामजना येथील कोविड केअर सेंटरला अचानक जाऊन भेट दिली. तसेच तिथे त्यांनी रुग्णांशी संवाद साधला व त्यांच्या काही अडचणी आहेत का त्याची पाहणी केली. येथील कोविड केअर सेंटरमध्ये मिळत असणाऱ्या वैद्यकीय उपचारांची तसेच जेवणाची व्यवस्था कशी आहे याची विचारपूस केली. याच सोबत त्यांनी जेवण मागवून स्वतः जेवणाची क्वालिटी तपासून पहिली.
जेवणात काही वेळा फक्त भाजी तर काही वेळा फक्त दाळ मिळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याशी संपर्क करून रुग्णांना चपाती, भात, भाजी व दाळ असा संपूर्ण आहार दोन्ही वेळेस न चुकता मिळालाच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश आ. पवार यांनी दिले. यावेळी रुग्णांशी चर्चा करून त्यांना न घाबरण्याचे आवाहन केले. तसेच रुग्णांनी देखील डॉक्टरांकडून मिळत असलेल्या उपचारांबाबत समाधान व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
- परदेशातून काय मदत आली, हे आदित्य ठाकरे यांना विचारा; दरेकरांचे जयंत पाटलांना प्रत्युत्तर
- नरेंद्र मोदींनी देशाला ‘चीनचा कचरा, चिंता आणि चिता’ हे तीन ‘चि’ दिले – नाना पटोले
- पाया काय पडता प्रस्ताव पाठवा ; मेटेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले
- ‘केंद्राने लसींचा मुबलक साठा दिलाय, मात्र राज्य सरकार जाणूनबुजून तुटवडा निर्माण करतंय !’
- ‘मोदींकडून कौतुक, पण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडले’, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
