Share

रेणुका चौधरींची तुलना शूर्पणखेशी; मोदींच्या फिरकीनंतर कॉंग्रेसचा संताप

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाला राज्यसभेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं. त्यावेळी मोदींनी आधार कार्ड संकल्पनेचं श्रेय तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणींना दिलं. तेव्हा काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी जोरात हसू लागल्या. चौधरी यांच्या कुत्सित हास्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टिपण्णी केल्यानंतर आता काँग्रेस आता चांगलीच आक्रमक झालीय. नरेंद्र मोदींनी माफी मागावी, यासाठी काँग्रेसनं राज्यसभेत गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचं कामाकाज एका तासासाठी तहकूब करण्यात आलं.

काय आहे नेमकं प्रकरण ?
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाला राज्यसभेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं. त्यावेळी मोदींनी आधार कार्ड संकल्पनेचं श्रेय तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणींना दिलं. तेव्हा काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी जोरात हसू लागल्या. सभापती व्यंकय्या नायडू यांनी चौधरींच्या हास्यावर नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी मोदींनी व्यंकय्या नायडूंना मध्येच थांबवलं. ‘रेणुकाजींना काहीही बोलू नका, अशी माझी सभापतींना विनंती आहे. ‘रामायण’ मालिकेनंतर बऱ्याच वर्षांनी असं हास्य ऐकण्याचं भाग्य लाभलं’ असा टोला मोदींनी लगावला. रेणुका चौधरी यांच्या हसण्याची तुलना शूर्पणखेच्या राक्षसी हास्याशी केली.

मोदींच्या वक्तव्यानंतर भाजपसह मित्रपक्षातील सर्व सदस्य जोरजोरात हसायला लागले. ‘पंतप्रधानांनी वैयक्तिक टीका केली आहे. अर्थात तुम्ही त्याशिवाय काय अपेक्षा करु शकता. मला यावर प्रतिक्रिया देऊन खालच्या स्तराला जायचं नाही. कुठल्याही महिलेबाबत असं वक्तव्य करणं निंदनीय आहे’ असं चौधरी म्हणाल्या.यानंतर ‘मंत्री किरेन रिजीजू यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ आक्षेपार्ह आहे.

ही मंडळी बेटी बचाओ आणि महिलांच्या सन्मानाच्या मोठमोठ्या बाता करतात, सन्मान राखण्याचा त्यांचा हा मार्ग आहे का? मी दोन तरुण मुलींची आई आहे. मी कोणाची तरी पत्नी आहे आणि माझी तुलना शूर्पणखेच्या राक्षसी हास्याशी केली जाते. हे अत्यंत लज्जास्पद आहे.’ या शब्दात रेणुका चौधरींनी संताप व्यक्त केला.दरम्यान पंतप्रधानांनी घेतलेली रेणुका चौधरी यांची फिरकी आणि शूर्पणखेच्या राक्षसी हास्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!