मुंबई: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार म्हणून ओळख निर्माण करणारी अभिनेत्री साई पल्लवीचा आज वाढदिवस आहे. २९ व्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिच्या चाहत्या वर्गाने तिला शुभेच्छा दिल्या आहे. ‘प्रेमम’ या चित्रपटामुळं साईला प्रसिध्दी मिळाली. तिच्या सुंदर चेहऱ्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री म्हंटल की मेकअप हा आलाच. जवळ जवळ सगळ्याच अभिनेत्री या मेकअप शिवाय अभिनय करत नाही. परंतु आता तुम्हाला आश्चर्य वाटेल साई कधीच मेकअप करत नाही. याआधी साईनं मेकअप न करण्याचे कारण सांगितलं होत.
ती म्हणाली होती, “मेकअप करण्याला माझा विरोध नाही. पण मेकअप का करावा? त्या मागचा उद्देश काय हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आपल्या देशात गौरवर्णीय महिलांना सुंदर म्हटलं जातं. त्यामुळं महिला गौरवर्णीय दिसण्यासाठी कॉस्मेटिकचा भरमसाठ वापर करतात. या प्रवृत्तीला माझा विरोध आहे. कारण आपल्या त्वचेचा रंग कुठला असेल हे आपल्या हातात नाही. मग गोरं दिसण्याचा अट्टहास कशाला? अन् जे गोरे आहेत त्यामागे त्यांचं कर्तृत्व काय? त्यामुळं मी गोरं दिसण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मेकअप करत नाही. मला लोकांनी स्विकारावं अशी माझी अपेक्षा आहे.”
साईनं तिच्या करिअरमध्ये कधीही कुठल्याही फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीत काम केलेलं नाही. तिने अशा अनेक कोट्यवधींच्या जाहिरातींना विरोध केला आहे. शिवाय ज्या चित्रपटांमध्ये मेकअप करण्यासाठी जबरदस्ती केली ते चित्रपट देखील तिनं सोडले आहेत. मात्र असे असूनही ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी : पाटील
- धारूर तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका!
- यापुढे कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी आकारणार शुल्क
- कोरोनाबाबत राज्यातील जनतेची केली जाणारी दिशाभूल बंद करा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘हिंदुस्थानी भाऊ’ला मुंबई पोलिसांनी केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
