मुंबई : मार्च महिन्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा एकदा स्थिती बिकट झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, प्लाज्मा आदींचा तुटवडा भासत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनाची दुसरी लाट गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजवत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यातील परिस्थितीबद्दल आढावा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज फोनवर चर्चा झाली आहे. यावेळी लशीचा आणि ऑक्सिजनचा साठा अधिकधिक पुरवावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माहिती घेतली. दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.राज्यातील कोविड 19 संसर्ग संदर्भातील उपाययोजनांची माहिती दिली आहे. तसंच राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी तात्काळ लसींचा पुरवठा करण्याचीही मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिकचे बळ मिळावे अशी विनंती पंतप्रधानांना केली. महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहितीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी महाराष्ट्राचे नियोजन कसे आहे याबाबतही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेना नेत्यांनाच प्रसिद्धीची हौस, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जमवली गर्दी
- आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा
- यांच काही वेगळच चाललंय, निवृत्ती स्विकारण्याच्या वयात कसोटी पदार्पण; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पराक्रम
- ‘कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च करण्याऐवजी २० हजार कोटींचा ‘सेंट्रल व्हिस्टा’ हवा कशाला ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
