जळगाव : शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा बँकेतून कर्ज घेतात. कर्जाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. पण कर्ज देण्यासाठी हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. येत्या दोन दिवसांत बँक अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पेरणी तोंडावर आली आहे. तरीही बँकाकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा संथगतीने होत असल्याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. शेतकरी राजा ५२ टक्के रोजगाार जनतेला उपलब्ध करुन देतो. त्यांना कर्ज देण्यास कुणी नाटक करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कटीबध्द आहोत. आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींच्या सूचना व करण्यात आलेली तयारी याबाबत चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यात १ लाख ३३ हजार मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध आहे. बाहेरील राज्यातून काही बियाणे जिल्ह्यात येते. बनावट बियाणे खरेदी करुन शेतकऱ्यांची फसवणृूक होते. त्यासाठी कृषी विभागाची १६ भरारी पथके जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नेमण्यात आली आहेत. प्रत्येक भरारी पथकाने पाच दुकानांची तपासणी करावी. राज्याच्या सीमेवर एक भरारी पथक कायम रहावे. बनावट बियाणे जिल्ह्यात येणार नाही, अशी उपाययोजना करण्यात आली आहे. या वर्षी खते व बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे देण्याची तयारी कृषी विभागाने केली आहे. बनावट बियाणे विकाल तर खबरदार, असा इशाराही त्यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- महत्त्वाचे! ‘इएसआय’ सदस्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेऊन खर्च परत मिळणार
- आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा
- यांच काही वेगळच चाललंय, निवृत्ती स्विकारण्याच्या वयात कसोटी पदार्पण; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पराक्रम
- ‘कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च करण्याऐवजी २० हजार कोटींचा ‘सेंट्रल व्हिस्टा’ हवा कशाला ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
