Share

‘रोज गोमूत्र प्यायल्यास कोरोना होणार नाही’ ; भाजपाच्या आमदाराचा अनोखा दावा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे मोठ संकट उभ राहील आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ही मोठा ताण आला आहे. वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे अनेकांचा जीव गेला आहे. अशातच भाजपाच्या एका आमदाराने ‘रोज गोमूत्र प्यायल्यास कोरोना होणार नाही’ असा दावा करत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडियोमध्ये भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी रोज गोमूत्र प्यायल्यास कोरोना होणार नाही असं म्हणत गोमूत्र प्राशन केल्याचे यामध्ये दिसत आहे. या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सिंह यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. यापूर्वी, आसाममधील भाजप आमदार सुमन हरिप्रिया यांनी देखील गोमुत्र आणि शेणामुळे कोरोनासारखा आजारही बरा केला जाऊ शकतो, असा दावा केला होता.

कोरोनावर उपाय शोधण्यासाठी अनेक स्तरावरून प्रयत्न केले जात आहे. सध्या यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये वेगाने लसीकरण देखील सुरू करण्यात आले आहे. देशात अनेक प्रश्न निर्माण झाले असताना कोरोनाच्या या संकटामध्ये अशा प्रकारचे धक्कादायक दावे करण्यात येत असल्याने अनेकांकडून याबाबत रोष व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!