Share

शिल्पा शेट्टीच्या घरात कोरोनाचा शिरकाव ; एका वर्षाच्या मुलीसह संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या कोरोनाचा कहर वाढत आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या घरी असलेले सर्व लोक आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. शिल्पा शेट्टी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे. या कोरोनाच्या विळख्यात शिल्पाची अवघ्या वर्षाची लेक समिशा देखील अडकली आहे.

इंस्टाग्रामवर तिच्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये शिल्पाने म्हटले आहे की, ‘गेले 10 दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. माझी सासू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर समीशा, विवान, माझी आई आणि आता राज. याक्षणी सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करत नियमांनुसार ते आपापल्या खोल्यांमध्ये विलगीकरणात आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत आहेत. इतकेच नाही तर आमच्या घरातील दोन कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले असून, त्यांच्यावर वैद्यकीय सुविधेत उपचार सुरू आहेत.’ असे तिने यावेळी सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/COkJC7-BFZq/?utm_source=ig_web_button_share_sheet

या सगळ्यात शिल्पा मात्र कोरोनाची लागण होण्यापासून बचावली आहे. आपला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे. शिल्पाने पुढे लिहिले ‘भगवंताच्या कृपेमुळे सर्वजण लवकर बरे होत आहेत. माझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. सर्व नियमांनुसार, सर्व खबरदारी घेतली जात आहे आणि आम्ही बीएमसीच्या सर्व अधिकाऱ्यांच्या मदतीबद्दल आभारी आहोत, हे सर्व आपल्या सर्वांच्या मदतीनेच शक्य झाले आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांमध्ये माझे संपूर्ण कुटुंब असू द्या.’ अशी भावना तिने यावेळी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!