🕒 1 min read
सोलापूर – राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले असून सर्वत्र कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात अनेक सण-उत्सव रद्द करण्यात आले असताना या आठवड्यात रमजान ईद हा मुस्लीम धर्मियांचा देखील सण आला आहे.
ईद काळात कडक संचारबंदी लागू करणे अयोग्य आहे. आम्ही घरातच राहून ईद साजरा करू पण ईदला आवश्यक साधनसामग्री आणायची कुठून? त्यामुळे ८ ते १५ मे दरम्यान नियोजित कडक संचारबंदी शिथिल करा, अशी मागणी सोलापूर शहरातील मुस्लीम संघटना आंनी नेत्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
सोलापुरात रुग्णांची संख्या मोठी असताना असून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात बैठक सुरू आहे. बैठकीदरम्यान शहर काझी, अमजद अली हे पालकमंत्र्यांना भेटले असून १५ मे नंतर संचारबंदी लागू करा. त्यापूर्वी लागू केलेली संचारबंदी शिथिल करा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
याबाबत पालकमंत्री सकारात्मक निर्णय न घेतल्यास समाजातील मान्यवरांची बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरवू. अशी माहिती शहर काझी यांनी नियोजन भवनासमोर पत्रकारांशी बोलताना दिली
महत्त्वाच्या बातम्या
- आयपीएल स्थगितीनंतर सकारिया गेला रुग्णालयात ; घेतली कोरोनाग्रस्त बापाची भेट, म्हणाला…
- लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा;उदयनराजे आक्रमक
- ‘मराठा आरक्षण फडणवीसांनी दिले; एकही मराठा मुख्यमंत्री मराठा आरक्षण देऊ शकला नाही’
- आयपीएल -14 चे उर्वरित सामने कधी आणि कोठे होतील? ‘हे’ आहेत पर्याय
- धक्कादायक! ‘प्रोटोकॉल’ तोडून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून मोदींच्या संभाषणाचा मजकूर व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
