Share

केंद्रीय मंत्री बंगालमध्ये येऊन दंगली भडकवत आहेत; ममतादीदींचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत आलेय. ममतांना पराभूत करण्यासाठी या निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या. भाजपचा ममता बॅनर्जींनी पार धुव्वा उडवला.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं २९२ पैकी २१३ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाचे ७७ जागांवर उमेदवार जिंकले आहेत. तर राष्ट्रीय सेक्युलर मजलिस पार्टीचा १ उमेदवार, तसेच एका अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला आहे. मात्र काँग्रेस आणि डावे पक्ष निवडणुकीत आपलं खातंही खोलू शकले नाहीत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ४४ तर माकपचे २५ आमदार निवडूण आले होते.

पश्चिम बंगालच्या निकालानंतर राज्यात विविध भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडत आहे. भाजप कार्यकर्त्यांवर सातत्याने हल्ले सुरुच आहेत. यात अनेक भाजप कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पथक पश्चिम बंगालमध्ये धाडण्याच्या केंद्राच्या निर्णयावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच संतापल्या आहेत. तुम्ही आत्तापर्यंत ऑक्सिजन आणि इतर सुविधांसाठी पथके का पाठवली नाहीत? आम्हाला आमचे काम करू द्या, जनतेचा कौल मान्य करा, असे सुनावत केंद्रीय मंत्री बंगालमध्ये येऊन दंगली भडकवत आहेत, असा आरोप केला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, ‘हे केंद्रीय पथक हाथरस सामूहिक अत्याचारासारख्या प्रकरणांचा, दिल्ली आणि उत्तरप्रदेशात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात इतकी तत्परता दाखवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. प. बंगालमधील निकालानंतर झालेल्या हिंसाचारात मारल्या गेलेल्या १६ जणांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मला माहीत आहे की या पैशातून त्यांचा माणूस परत येणार नाही. पण त्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल. सध्या केंद्र सरकार आणि भाजपला चांगल्या विचारांची गरज आहे.’ असे देखील त्या यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!