Share

पोलिस आयुक्त साहेब, वाहतूक पोलिसांना रुग्णवाहिकेचे गांभीर्य नाही का?

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा संसर्ग ओसरत असतांना ठीकठीकानी आता गर्दी बघायला मिळत आहे. जुन्या शहरात तर अक्षरशः ट्राफिक जाम होत आहे. शाहगंज भागात शुक्रवारी सकाळी ट्राफिक जाम मध्ये एक रुग्णवाहिका अडकली. तिला रस्ता देण्यासाठी कुणाचाच पुढाकार दिसला नाही. विशेष म्हणजे तिथे हाकेच्या अंतरावर दोन वाहतूक पोलीस उभे होते. यावरून वाहतूक पोलिसांना रुग्णवाहिकेचे गांभीर्य नाही का? असा सवाल नागरिक करत आहे.

शहरात तब्बल एक महिन्यांपासून कडक निर्बंध लावले आहे. त्याची अंबलबजावणी प्रशासन करत आहे. अर्ध्यापेक्षा जास्त पोलीस दल रस्त्यावर आहे. मध्यंतरी कामाची प्रशंसा करत पोलीस आयुक्तांनी शहर पोलिसांना शाबासकी देखील दिली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत मोठ्याप्रमाणात गर्दी दिसून येत आहे. गर्दीवर अंकुश लावण्यासाठी पोलिस दलातील उपाययोजना कमी पडत आहे.

शाहगंज परिसरात भाजी मंडई आणि फळ विक्रेते मोठ्याप्रमाणात आहे. खरेदी करण्यासाठी लोकांची अक्षरशः गर्दी उसळून येत आहे. परिणामी तिथे रोज ट्राफिक जाम होत आहे. त्यासाठी तिथे वाहतूक कर्मचारी नेमले आहे. शाहगंज परिसरातील चेलापुरा रोडवर सकाळी ट्राफिक जाम झाले, त्या जाम मध्ये एक रुग्णवाहिका अडकली. चालकाने वारंवार सायरन वाजवून पण त्या रुग्नावाहीकेला लवकर रस्ता मिळाला नाही. तिथे तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी तिला रस्ता मोकळा करून द्यायची तसदी घेतली नाही. चालकानेच कसाबसा रस्ता काढत रुग्णवाहिका तिथून नेली. त्यामुळे पोलिसांना रुग्णवाहिकेचे गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून आले.

  महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!